कर्जत MIDC प्रकरणी एका बिनडोक व्यक्तीच्या नादी लागून अजित पवार हे निर्णय घेत असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
अतिशय अभ्यास करून एमआयडीसी मंजूर करून घेण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु एका बिनडोक व्यक्तीच्या नादाला लागून अजित पवार एमआयडीसी रद्द करण्याचा निर्णय घेत असतील तर तो चुकीचा आहे. अजित पवार यांनी भूमिका बदलल्यानंतर ते पूर्वीची स्टाईल विसरत असतील तर हे चुकीचं आहे.
आपण कर्जतचे आमदार असून लोकांना शब्द दिला आहे. पण फक्त राजकीय विरोधातून एमआयडीसीचा निर्णय प्रलंबित केला जात असेल तर तो एकट्या रोहित पवाराचा विषय नाही तर आख्ख्या मतदारसंघाचा विषय आहे. जनतेला दिलेला शब्द मला पाळता येत नसल्याचं दुःख आहे. अजित पवार एमआयडीसीला विरोध करणाऱ्या व्यक्तीला साथ देत असतील तर पुतण्या म्हणून मला नक्कीच वाईट वाटेल. अजित पवार यांना विनंती आहे की कोण खरं आणि कोण खोटं हे त्यांनी पहावं आणि एमआयडीसी बाबतचा निर्णय घ्यावा.