राळेगणसिद्धी: राज्य सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे. त्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कडाडून टीका केली आहे. तुम्ही जनतेचे सेवक आहात. मालक नाही. त्यामुळे तुम्ही जनतेची परवानगी घेऊनच निर्णय घेतला पाहिजे. तुम्ही मनमानी कशी करू शकता?, असा सवाल करतानाच वाईनही आपली संस्कृती नाही. आपल्या राज्यात दारुची दुकानं कमी आहेत का? तरीही किराणा आणि सुपरमार्केटमध्ये वाईन का ठेवता? तुम्हाला तरुण पिढीला व्यसनाधीन करायचं आहे का? तुमच्या या निर्णयाने मी दु:खी झालो आहे. त्यामुळे मला तुमच्या राज्यात जगायची इच्छा राहिली नाही, असे हताश उद्गार अण्णा हजारे यांनी काढलं आहे. 14 पासून होणारे अमरण उपोषण पुढे ढकलल्याचेही त्यांनी जाहीर केलं.
राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी काल अण्णा हजारे यांच्याशी वाईन विक्रीबाबतच्या निर्णयाबाबत चर्चा केली. त्यानंतर अण्णा हजारे यांनी ग्रामसभा बोलावली. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्रात दारू कमी आहे? बीयर बारचे दुकाने आहेत ना. परमिट रुमही आहेत. वाईन शॉपीचे दुकानेही आहेत. त्यात वाईन मिळते ना? तुम्ही परत दुकानात का ठेवता? सुपर मार्केटमध्ये का ठेवता? एवढी दुकाने असताना आणखी का ठेवता? सर्व लोकांना व्यसानाधिन करायचं आहे का? लोक व्यसनाधीन झाले की आपल्याला जे साधायचं ते साधून घ्यायचं असा काही डाव आहे का? अरे व्यसानाने बरबाद झाले ना लोक. युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. ही बालकं आमची संपत्ती आहे. ही बालकं व्यसनाधीन झाली तर काय होणार?, असा सवाल अण्णा हजारे यांनी केला.
शेतकरी आंदोलन झाले, जनतेचे सेवक असणारे केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे मंजूर केले, तेव्हा कुठे गेले होते, खरे तर तेव्हा उपोषण करायला पाहिजे होते, जनता आता विश्वास ठेवणार नाही,