Friday, January 17, 2025

अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट, 38 जणांना फाशी तर 11 जणांना आजन्म कारावास

अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट, 38 जणांना फाशी तर 11 जणांना आजन्म कारावास
अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादमध्ये 2008 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए आर पटेल यांनी 49 दोषींपैकी 38 जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. इतर 11 जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
दोषींच्या शिक्षेवरील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर विशेष कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. सरकारी वकिलांनी सर्व दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली तर आरोपींच्या वकिलांकडून कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती. न्यायाधीश पटेल यांनी 8 फेब्रुवारीला निर्णय देताना सर्व 49 आरोपींना दोषी ठरवलं होतं. कोर्टाने 77 पैकी 28 आरोपींची सुटका केली होती. त्यामुळे या 49 आरोपींना काय शिक्षा दिली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होते. त्यानुसार निकाल आला असून 38 जणांना फाशी तर 11 जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 2008 मध्ये अहमदाबादमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटात 56 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 200 जण जखमी झाले होते. 26 जुलै 2008 रोजी हे बॉम्बस्फोट झाले होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles