पाथर्डी- राजकीय नौटंकी करण्याचे काम भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते करत असून सत्ता नसल्यामुळे व आमदारकी गेल्यामुळे काही लोक बेचैन झाले असल्याची टीका ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माजी आमदार कर्डिले यांचे नाव न घेता केली.
पाथर्डी तालुक्यातील शिराळ येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन मंत्री तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
तनपुरे म्हणाले, मागील दहा वर्षात भाजपची राज्यात व देशात सत्ता होती त्यावेळी मतदारसंघात किती नवीन सप्टेशन मंजूर केले हे सांगावे. पाथर्डीसारख्या दुष्काळी तालुक्याला पूर्ण दाबाने शेतीपंपासाठी वीज पुरवठा व्हावा यासाठी शिराळ येथे नवीन विद्युत उपकेंद्राला मंजुरी मिळाली असून कामाला देखील लवकरच सुरवात होईल असा विश्वास तनपुरे यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि प अध्यक्ष बाबासाहेब भिटे, माजी सभापती काशिनाथ पाटील लवांडे, संभाजी पालवे, पंचायत समिती सदस्य राहुल गवळी,सरपंच अमोल वाघ,रवींद्र मुळे,उपसरपंच अमोल घोरपडे,आदी उपस्थित होते.