Tuesday, September 17, 2024

आमदारांनाही आवडली इलेक्ट्रिक रिक्षा…. ड्रायव्हर सीटवर बसून केली पाहणी

प्रदूषण मुक्त इलेक्ट्रिक रिक्षा वापरणे ही काळाची गरज – आशुतोष काळे*

*एक्साइड कंपनीच्या इलेक्ट्रिक रिक्षा शोरूम चे मठाधिपती रमेशगिरी महाराजांच्या हस्ते उद्घाटन*

पाडेकर मोटर्सने एक्साईड कंपनीच्या इलेक्ट्रिक रिक्षा शोरूम चालू केले कोपरगावकरांसाठी अतिशय चांगली बातमी आहे वाढत्या प्रदूषणमुक्तीसाठी व महागाई पासून बचाव करण्यासाठी अतिशय चांगला मार्ग ग्राहकांना निवडता येईल असे प्रतिपादन शिर्डी संस्थानचे अध्यक्ष नामदार आशुतोष काळे यांनी केले पुणतांबा फाटा, जगताप पेट्रोल पंपाशेजारी कोपरगाव येथे अहमदनगर जिल्ह्याचे अधिकृत विक्रेते पाडेकर मोटर्स यांनी इलेक्ट्रिक रिक्षा लोडिंग रिक्षा छोट्या व्यवसायासाठी रिक्षा अशा विविध प्रकारच्या रिक्षा शोरूमचे मालक विष्णू पाडेकर यांनी उपलब्ध करून दिल्या आहे ४ युनिट विजेच्या खर्चात १४० किलोमीटरचा प्रवास ५ प्रवासी रिक्षामध्ये करू शकतात आर.टी.ओ. पासिंग, इन्शुरन्स सुविधादेखील पाडेकर मोटर्समध्ये ग्राहकांना मिळणार आहे या भव्य शोरूमचे उद्घाटन संत जनार्दन स्वामी आश्रम चे मठाधिपती महंत रमेश गिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख उपस्थिती मध्ये महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे, महाराष्ट्र राज्याचे सहकार समन्वयक उत्तमराव देसले, साईबाबा संस्थानचे विश्वस्त डॉ.एकनाथ गोंदकर अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी यशवंत अभाळे, मा. नगरसेवक दत्तात्रय जगताप, मा. तहसीलदार दगडू दुशिंग, एक्साइड कंपनीचे ऍड.आनंद उमरीकर, अमर पाठक जिल्हा परिषद सदस्य प्रसाद साबळे, पालघर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, सविता विधाते, तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, रवींद्र साबळे, विजय जाधव ,ज्ञानेश्वर भगत,अमोल शिंदे,दिलीप लासुरे, चेअरमन किरण चव्हाण, शीतल देशमुख,शिवाजी ठाकरे, अशोक कानडे, उद्योजक तुषार जगताप, धोत्रे येथील सरपंच अशोक गवारे संजय चव्हाण, मिराज मौलाना,मयूर धोंड, संजय दुशिंग आदी मान्यवर उपस्थित होते

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles