*जिल्हा बँकेचे माजी संचालक पांडुरंग सोले पाटील सह नवनिर्वाचित तेरा संचालकांचाआमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश*
जामखेड (नासीर पठाण) -महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे संचालक व जिल्हा बँकेचे माजी संचालक पांडुरंग गोपाळराव सोले पाटील व त्यांचे बंधू भारत पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवनिर्वाचित सर्व तेरा संचालकासह आ. रोहीत पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. सोले पाटील बंधुच्या पक्षप्रवेशाने भाजपला विशेषत विखे पाटील यांना मोठा धक्का मानला जातो.
तालुक्यातील अरणगाव येथील अरण्येश्वर मंदिराच्या कामाची पाहणी व सिमेंट रस्त्याच्या भुमीपुजनसाठी आ. रोहीत पवार आले असता पांडुरंग व भारत सोले पाटील यांनी चार दिवसापूर्वी बिनविरोध झालेल्या अरणगाव सेवा संस्थेच्या नवनिर्वाचित संचालक यांच्यासह प्रवेश केला.
यावेळी बोलताना पांडुरंग सोले पाटील म्हणाले, आ. रोहीत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अरणगाव सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. आम्ही सर्व संचालक तालुक्याच्या विकासासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहोत तालुक्यात इतर सेवा संस्थेच्या निवडणुका होत असून आ. रोहीत पवार यांच्या नेतृत्वाखाली असाच पायंडा पडेल व पवारांचे नेतृत्व उजळून निघेल असा विश्वास व्यक्त केला.
आ. रोहीत पवार म्हणाले, सहकार महर्षी कै. गोपाळराव सोले पाटील यांचे सहकारातील काम सर्वांना माहित आहे. माझ्या आमदारकी निवडणूकीपासून पांडुरंग सोलेपाटील बंधुच्या संपर्कात आहोत. सहकार क्षेत्राचा विकास करण्यासाठी व येथून पुढे होणाऱ्या निवडणुकीसाठी त्यांचे मार्गदर्शन मिळेल. येथील स्थानिक राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी यांच्या प्रवेशासाठी मोठे मन दाखवले.
यावेळी नवनिर्वाचित संचालक सोलेपाटील भारत गोपाळराव, शेख आयुब इब्राहिम, अंगद बलभीम निगुडे, प्रवीण मधुकर निगुडे, अशोक भाऊ पारे रोमाडे लक्ष्मण जयवंता, ननवरे शहाजी शिवदास, सोलेपाटील प्रशांत पांडुरंग, मस्के प्रभु साहेबराव, निर्मळ भारत नामदेव,
प्रविण नवनाथ ससाणे, सौ.जयमाला भारत सोले पाटील, सौ.मंगल अजिनाथ सोले उपस्थित होते. पंचायत समितीचे सभापती सुर्यकांत मोरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे यांनी नवनिर्वाचित संचालक व पांडुरंग व भारत सोले पाटील यांचे राष्ट्रवादी प्रवेशाचे अभिनंदन केले आहे.
आ.रोहित पवार यांचा दे धक्का…. जामखेड तालुक्यातील बडे प्रस्थ समर्थकांसह राष्ट्रवादीत दाखल
- Advertisement -