पारनेर नगरपंचायतच्या नगरध्यक्षपदी आमदार नीलेश लंके यांचे कट्टर समर्थक विजय औटी यांची तर उपनगराध्यक्षपदी सुरेखा अर्जुन भालेकर यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. दरम्यान नगरध्यक्षपदाच्या या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमतापर्यंत पोचता आले नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार नीलेश लंके यांनी अपक्ष व पारनेर शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांना बरोबर घेत बहुमत मिळविले. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विजय सदाशिव औटी तर शिवसेनेतर्फे नवनाथ सोबले यांनी अर्ज दाखल केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत असल्याने औटी यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदासाठी उद्योजक अर्जुन भालेकर यांच्या पत्नी सुरेखा भालेकर यांच्या नावावर काल राष्ट्रवादीत एकमत झाले. त्यानुसार सुरेखा भालेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांची बहुमताने निवड झाली.
- Advertisement -