नगरकरांनी एकत्रित येऊन लोकसहभागाची चळवळ उभी करावी – आ.संग्राम जगताप
अहमदनगर प्रतिनिधी – शहर विकासासाठी सर्वांच्या सहकार्याची खरी गरज आहे.केंद्र राज्य व मनपाच्या विकास निधीतून विविध विकास कामे सुरू आहे मात्र नागरिकांना एकत्रित करून लोकसहभागातून विकास कामे व्हावे यासाठी आम्ही एक पाऊल पुढे टाकले आहेत. ‘थेंबे-थेंबे तळेसाचे’ या म्हणीच्या उपदेशाप्रमाणे नागरिकांनाही विकास कामांमध्ये सहभागी करून शहर विकासाला चालना दिली आहे. सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, छोटे-मोठे उद्योजक,व्यावसायिक यांनी पुढे येऊन शहराबद्दलचे आपले कर्तव्य पार पडावे यासाठी लोकसहभागात सामील व्हावे, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कोके चाळ, कोठी चौक ते कॉंक्रीट रस्ता पर्यंत तसेच जिल्हा बँक ते देवी मंदिरा पर्यंत अशा रस्त्यांची कामे लोकसहभागातून हाती घेण्यात आली आहे याच बरोबर शहरातील काही व्यावसायिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून महात्मा फुले चौक तसेच प्रेमदान चौका मध्ये लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आली आहे लवकरच चाणक्य चौकातही असाच उपक्रम राबविला जाणार आहे.याचबरोबर चौका-चौकांमध्ये अपघात होऊ नये सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून दुभाजके बसविण्याचे कामही सुरू आहे तसेच लोकसहभागातून दुभाजके रंगरंगोटी करण्याचे कामही सुरू आहे शहराच्या विकासासाठी नगरकरांनी एकत्रित येऊन लोकसहभागातून मोठी चळवळ निर्माण करावी असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
आ.संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून लोकसहभागातून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कोके चाळ, कोठी चौक ते कॉंक्रीट रस्ता पर्यंत तसेच जिल्हा बँक ते देवी मंदिरा पर्यंतच्या रस्ता डांबरीकरण कामांचा शुभारंभ संपन्न झाला यावेळी उपमहापौर गणेश भोसले,राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते,महिला शहराध्यक्ष रेश्माताई आठरे,नगरसेवक प्रकाश भागानगरे,नगरसेवक विपुल शेटीया, मा.नगरसेवक संजय चोपडा,राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे,सामाजिक कार्यकर्ते संभाजी पवार,उद्योजक नसीर शेख,प्रा.रावसाहेब क्षेत्रे,आरिफ सय्यद, अल्ताफ शेख,खंडू काळे,अनिकेत आगरकर,नवनाथ वाघ,महेश निमसे, सोमनाथ तांबे,यशवंत भांबळ,इंजि.अभिजीत काळे,मळू गाडळकर तसेच आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की,आ.संग्राम जगताप यांनी सुरू केलेला लोकसहभागाचा उपक्रम कौतुकास्पद आहे या तीन रस्त्यांची कामे अत्यंत महत्त्वाची होती बुरुडगाव परिसरातील उपनगराला जोडणारे हे तीन रस्ते असून आता ही कामे लवकरच पूर्ण होतील.स्टेशन रोड परिसर,आगरकर मळा,विनायक नगर, बुरुडगाव परिसर, माणिकनगर,सारसनगर परिसराला दूषित पाणीपुरवठा होत होता आता ही पाईपलाईनची कामे आ.संग्राम जगताप यांच्या प्रयत्नामुळे पूर्ण केल्या आहे या परिसरातील जमिनीअंतर्गत असलेल्या योजना पूर्ण केले आहेत आता रस्त्यांची कामे हाती घेतली आहे भुयारी अमृत योजनेचे कामही पूर्ण होऊन लवकरच शहराच्या रस्त्याच्या कामाला गती प्राप्त होणार आहे असे ते म्हणाले.