Friday, June 14, 2024

इगतपुरीमधील धक्कादायक घटना, भावली धरणात बुडून ५ जणांचा मृत्यू

नाशिकच्या इगतपुरीजवळच्या भावली धरणामध्ये बुडून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन तरुण आणि तीन तरुणींचा समावेश आहे. हे सर्वजण रिक्षा घेऊन धरणावर फिरण्यासाठी आले होते. स्थानिक आदिवासी नागरिकांच्या मदतीने सर्वांचे मृतदेह धरणाच्या बाहेर काढण्यात आले आहे.

काही तरुण आणि तरुणी हे रिक्षाने आज दुपारी इगतपुरी येथील भावली धरणावर फिरण्यासाठी आले होते. धरणामध्ये उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडून त्यांचा मृत्यू झाला. मृत तरुण आणि तरुणी नाशिकच्या जेलरोड परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिकांच्या मदतीने त्यांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी इगतपुरी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

अनस खान दिलदार खान (15 वर्षे), नाझिया इमरान खान (15 वर्षे), मीजबाह दिलदार खान (16 वर्षे ), हनीफ अहमद शेख (24 वर्षे) आणि ईकरा दिलदार खान (14 वर्षे) असे धरणात बुडून मृत्यू झालेल्या तरुण-तरुणींची नावं आहेत. यांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. खान आणि शेख कुटुंबावर सध्या दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles