*संकल्पसिध्दी व कर्तव्यपुर्तीचा आनंद*
————————–
*दि.१० नोव्हेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांनी माझी सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती केली. लगेचच म्हणजे दि.१२ रोजी मी सिंधुदुर्गला आलो आणि जिल्हाध्यक्ष श्री.बाळा गावडे व अन्य नेत्यांच्या भेटी घेऊन कामाला सुरुवात केली*.
*मागील तीन महिन्यात आठ वेळा सिंधुदुर्गचे दौरे केले.प्रत्येक तालुक्याला भेटी दिल्या. कार्यकर्ते व पदाधिकारयांची मते जाणून घेतली. यावेळी लक्षात आले की या जिल्ह्यात काँन्ग्रेसला मोठी संधी आहे.*
*दरम्यान नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या.आदरणीय प्रदेशाध्यक्षांनी सांगितले की, काँन्ग्रेसने ही निवडणूक स्वबळावर लढवावी. जिल्ह्यातील बहुतांश प्रमुख नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे हेच मत जाणवले. आणि मग तयारीला सुरुवात केली*.
*प्रारंभी उमेदवार मिळणे अवघड वाटत होते. अन्य पक्षांची साधनसामग्री पाहता आपल्या तोकडेपणाची वारंवार जाणीव होत होती. परंतु कार्यकर्त्यांचा उत्साह व प्रदेशाध्यक्षांची खंबीर साथ यामुळे सर्वांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीपूर्वी चारही नगरपंचायतीत काँन्ग्रेसचा एकही नगरसेवक नव्हता.आणि फार मोठ्या यशाची अपेक्षा देखील नव्हती. मात्र कार्यकर्त्यांचे spirit टिकवुन ठेवण्यासाठी निवडणूक स्वबळावर लढविणे गरजेचे होते.*
*सत्य संकल्पाचा साथी परमेश्वर!!* ,
*हे या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा जाणवले. कुडाळ सारख्या संवेदनशील नगरपंचायतीत एकुण १७ जागांची निवडणूक झाली. भाजपाला आठ , शिवसेनेला सात तर काँन्ग्रेसला दोन जागा मिळाल्या. नियतीने सत्तेची चावी काँन्ग्रेसच्या हातात दिली. जिल्ह्याचे संपर्कमंत्री ना.सतेज पाटील यांनी बहुमोल सहकार्य करून महत्वाची भूमिका बजावली*. *आणि अखेर काल काँन्ग्रेसच्या आफ्रिन करोल नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्या* * .
*या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस पक्ष एका अल्पसंख्याक समाजाच्या भगिनीला आफ्रिन करोल यांच्या रुपाने नगराध्यक्ष पदाची संधी देऊ शकला ,याचा विशेष आनंद वाटतो. हि घटना कोकणच्या भावी राजकारणावर परीणाम करणारी ठरणार आहे.*
*काँन्ग्रेसने ही निवडणूक स्वबळावर लढविल्यामुळेच काँन्ग्रेसचा नगराध्यक्ष होऊ शकला. आघाडी करून निवडणूक लढविली असती तर आज उपनगराध्यक्ष पदावरच समाधान मानावे लागले असते*
*प्रदेशाध्यक्ष नानाभाऊंची खंबीर साथ, संपर्कमंत्री ना.सतेज पाटील यांचे सहकार्य आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची जिद्द यामुळेच संकल्प व स्वप्न प्रत्यक्षात आले*.
*त्यामुळेच आज कर्तव्यपुर्तीच्या समाधानाची शिदोरी सोबत घेऊन सिंधुदुर्गहुन अहमदनगरला परतत आहे.*
————————–
*विनायकराव देशमुख*
*सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तथा प्रभारी, सिंधुदुर्ग जिल्हा*