Sunday, September 15, 2024

कर्जतमध्ये मोहीम फत्ते…. नगराध्यक्ष निवडीनंतर आ.रोहीत पवार म्हणाले….

नगर: कर्जतकरांनी मतदानरुपी दिलेल्या भरभरुन प्रेमानंतर उषा राऊत यांची नगराध्यक्ष म्हणून तर रोहिणी घुले यांची उपनगराध्यक्ष म्हणून निवड झाली. निवडीनंतर आमदार रोहित पवार यांच्या सह नवनिर्वाचित पदाधिकारी, नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या सर्वांनी ग्रामदैवत सद्गुरु संतश्री गोदड महाराजांचा आशिर्वाद घेतला.

यासाठी सर्व नगरसेवकांनी सहकार्य केलं, या सर्वांचे आभार! नगरपंचायतीचा कारभार रणरागिणींच्या हाती देता आला याचं समाधान आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा! या दोघी भगिनी कर्जतकरांना दिलेला विकासाचा शब्द पूर्ण करण्यासाठी काम करतील, असा विश्वास आ. रोहित पवार यांनी व्यक्त केला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles