कल्याण रोड सीना नदी वरील जीवघेणे खड्डे तातडीने बुजवा : दत्ता गाडळकर
अहमदनगर प्रतिनिधी : कल्याण रोड हा राष्ट्रीय महामार्ग असून नगर शहरातून जात आहे. सीना नदी वरील ठेकेदाराने अर्धवट सोडून दिलेल्या डांबरीकरणाच्या कामामुळे सीना नदीचा उतारावर डांबरीचे कठाडे तयार झाले असून रस्त्यावर खोल खड्डा पडला आहे त्यामुळे दुचाकीस्वार दररोज या खड्ड्यामध्ये पडत आहेत आत्तापर्यंत अनेक नागरिकांना दुखापत झाली आहे लवकरात लवकर हा खड्डा बुजवा अन्यथा नागरिकांना आंदोलन करावे लागेल असा इशारा राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर यांनी दिला.
कल्याण रोड परिसरामध्ये मोठी लोकवस्ती वाढली आहे सीना नदी वरील खड्डा हा जीव घेणे झाला आहे तरी प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन बुजवावा सीना नदीवरील पूल ही धोकादायक बनला असून या पुलावर ही मोठमोठे खड्डे पडले आहे. पावसाळ्यामध्ये हा पूल पावसाच्या पुराखाली जात असतो तरीही या पुलाचे काम लवकरात लवकर मार्गे लावावे असे ते म्हणाले.