सोशल मीडियावर सध्या एक मेसेज जोरात व्हायरल होत आहे, त्यामध्ये असा दावा करण्यात आलाय की सरकारकडून तरुणांना प्रति महिना 25 हजार रुपये आणि नोकरी दिली जाईल. हा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे .
डिजिटल इंडियाअंतर्गत सरकारकडून अनेक योजना चालवल्या जात आहेत. ज्यामध्ये सरकारकडून तरुणांना रोजगार देण्यात येत आहे. सोशल मीडियावर नोकरी देणारा मेसेज व्हायरल होत आहे, याचे केंद्र सरकारच्या PIB ने फॅक्ट चेक केलं आहे.
मेसेजमध्ये काय दावा केलाय?
670 रुपये दिल्यानंतर केंद्र सरकारच्या डिजिटल इंडियाच्या योजनेअंतर्गत टॉवर लावण्यात येईल. 25 हजार प्रतिमहिना मिळाले, तसेच नोकरीही देण्यात येईल.
–
PIB Fact Check ने आपल्या अधिकृत ट्विटरवर ट्विट करत व्हायरल होणारा मेसेज फेक असल्याचे सांगितले आहे. डिजिटल इंडिया योजनेअंतर्गत कोणताही टॉवर लावण्यात येत नाही. यासारख्या व्हायरल मेसेजपासून सावध राहा…