Thursday, September 19, 2024

कॉंग्रेसचा एकाचवेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेला दणका, 20 नगरसेवकांचा पक्षप्रवेश

मागील महिन्यात काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढण्याचा नारा दिल्यानंतर मालेगावमध्ये काँग्रेसच्या माजी आमदार, महापौरांसह नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याची आज काँग्रेसने राष्ट्रवादीला परतफेड केली आहे. मुंबईतील टिळक भवन येथे मंत्री अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. राष्ट्रवादीकडे असलेल्या सेलू नगरपरिषदेतील नगराध्यक्षांसह सर्व 20 नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. तर नांदेड, औरंगाबादमधील राष्ट्रवादीच्या महत्वपूर्ण पदाधिकाऱ्यांचा तसंच, भाजपच्याही कार्यकर्त्यांचाही काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश झाला आहे.
राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या सेलु नगरपरिषदेतील नगराध्यक्षांसह सर्व 20 नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीत पक्षप्रवेशांची चढाओढ दिसत आहे. अशातच काही दिवसांपूर्वी मालेगाव महापालिकेतील सर्व काँग्रेसच्या सदस्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. परभणी, औरंगादाबाद, नांदेड येथे राष्ट्रवादीला मोठं खिंडार पाडून आज मोठ्या संख्येनं महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आज परभणीतल्या जिंतुर आणि सेलु नगरपरिषदेतील नगराध्यक्षांसह इतर नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles