Wednesday, April 30, 2025

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा तब्बल ११ राज्यांमध्ये शिरकाव,अशी लक्षणे दिसल्यास सतर्क व्हा!

कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट ‘जेएन.१’ ने देशभरात हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत तब्बल ११ राज्यांमध्ये व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशात JN.1 च्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे, असं आवाहन आरोग्य प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये जीनोम सिक्वेन्सिंग दरम्यान देशात JN.1 व्हेरिएंटचे ४ रुग्ण आढळून आले होते. हा आकडा आठवडाभरातच १७ वर गेला. याचा अर्थ असा की हा व्हायरस एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत किंवा अगदी तिसऱ्या व्यक्तीपर्यंत झपाट्याने पसरतो.

नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) ने देखील आरोग्य मंत्रालयाला एक अहवाल सादर केला आहे, ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की JN.1 संसर्ग देशातील ११ राज्यांमध्ये पोहोचला आहे. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्राव्यतिरिक्त गोवा, पुद्दुचेरी, गुजरात, तेलंगणा, पंजाब, दिल्ली आणि राजस्थानमध्येही कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.
‘जेएन.१’ व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांमध्ये सुरुवातीला ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, गॅस्ट्रो, डोकेदुखी यासारखी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्याने नागरिकांनी वेळीच सतर्क होऊन डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. जेएन १ व्हेरिएंटचा प्रसार झपाट्याने होत असला तरी, तो किती घातक आहे याबाबत अजूनही ठोस पुरावे मिळाले नाही.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles