गणेश आवारे यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवावी
जेऊर गटातील कार्यकर्त्यांचा आग्रह
नगर तालुका-नगर तालुक्यातील जेऊर जिल्हा परिषद गटातून युवा नेते गणेश आवारे यांनी निवडणूक लढवावीच असा आग्रह गटातील तरुण कार्यकर्ते करत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की गणेश आवारे यांनी आज पर्यंत निस्वार्थपणे समाजसेवा करण्याचे कार्य केलेले आहे. गणेश आवारे युवा प्रतिष्ठान च्या वतीने गणेश आवारे यांनी गटातील प्रत्येक गावात धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रासाठी मोठे योगदान दिलेले आहे. कोरोनाच्या काळात विविध शाळेमध्ये सॅनिटायझर, मास्क व ऑक्सीमीटरचे वाटप करून आवारे यांनी शिक्षणाप्रती असलेले प्रेम दाखवून दिले. तसेच विविध धार्मिक मंदिरे, गोरगरिबांना संकटकालीन मदतीचा हात दिलेला आहे.
गणेश आवारे यांचा मोठा जनसंपर्क असून तरुणांची मोठी फळी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. जेऊर गट पुनर्रचनेत बदलला असून पिंपळगाव माळवी व मांजरसुंबा गड ही गावे नव्याने जेऊर गटाला जोडण्यात आले आहेत. पूर्वी इमामपूर गाव देहरे गटात होते त्यामुळे आवारे यांची पिंपळगाव माळवी व मांजरसुंबा गावात सुरुवातीपासूनच चांगली प्रतिमा आहे. याचा निवडणुकीत निश्चित फायदा गणेश आवारे यांना होणार आहे.
गणेश आवारे यांची पाटी कोरी असून निष्कलंक असे व्यक्तिमत्त्व आहे. राजकारण विरहित समाज सेवा करणारा माणूस म्हणून त्यांची गटात ओळख आहे. जेऊर गावात तसेच गटात असणारा मित्रपरिवार व नातेसंबंध त्यांना निवडणुकीत फायदेशीर ठरणार आहेत. गणेश आवारे यांनी जेऊर गटातील गावांमध्ये राजकारणविरहित मैत्रीचे संबंध प्रस्थापित केलेले आहेत. त्यांना मानणारा मोठा वर्ग प्रत्येक गावात असून त्यांनी केलेल्या समाजसेवेचे फळ त्यांना निश्चित मिळणार आहे असे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येते.
राजकारणापेक्षा समाजसेवेला महत्व देणारे गोरगरीब जनतेला संकटामध्ये सदैव मदत करणारे आवारे यांच्या कार्याची पक्षाने दखल घेऊन त्यांना उमेदवारी देण्याची मागणी गावातील तरूण कार्यकर्त्यांकडून होत आहे. सदैव मदतीचा हात पुढे करत गणेश आवारे युवा प्रतिष्ठानचे धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य वाखाणण्याजोगे आहे. गणेश आवारे यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून समाजकारण करावे असा आग्रह जेऊर गटातील प्रत्येक गावातील तरुण वर्गाकडून होत आहे.
गणेश आवारे यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी अशी मागणी गोविंद जरे (सर), यशवंत आवारे, महेश गोडसे, विजय पाटोळे, लक्ष्मण ससे, कारभारी मगर, संजय येवले, सुनील शिकारे, छगन भगत, संतोष बोरुडे, बाळासाहेब काळे यांच्यासह गणेश आवारे यांच्या समर्थकांकडून होत आहे.
जेऊर गटातील राजकीय समीकरण बदलणार
जेऊर गटातून गणेश आवारे यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढविल्यास गटातील संपूर्ण राजकीय समीकरण बदलणार आहेत. गणेश आवारे यांचे गटातील वाढते प्रस्थ व तरुणांची मोठ्या प्रमाणात मिळत असलेली खंबीर साथ यामुळे गणेश आवारे यांच्या भूमिकेकडे विरोधकांसह सर्वांचे लक्ष लागून आहे.
गणेश आवारे हे अनेक वर्षापासून राजकारण विरहित समाजसेवा करत आहेत. सदैव गोरगरीब जनतेला मदत करणारे तसेच प्रत्येक गावात धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील गणेश आवारे युवा प्रतिष्ठान चे कार्य उल्लेखनीय आहे. जेऊर जिल्हा परिषद गट आवारे यांच्यासाठी सोयीस्कर झाला असून त्यांनी जनतेच्या आग्रहाखातर निवडणूक लढवावीच.
….. गोविंद जरे (सर)