डीएमआय फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडने गुगल पेच्या पात्र वापरकर्त्यांसाठी वैयक्तिक कर्ज देण्याची घोषणा केली. हे उत्पादन गुगल पेचे ग्राहक अनुभव आणि डीएमआयच्या डिजिटल कर्ज वितरण प्रक्रियेच्या दुहेरी फायद्यांचा लाभ घेते आणि नवीन कर्ज वापरकर्त्यांनाही या कक्षेत आणण्यास देखील मदत करेल. पात्र वापरकर्ते डीएमआय फायनान्सने निश्चित केलेले निकषानुसार पूर्व-पात्र आहेत आणि गुगल पेच्या माध्यमातून हे उत्पादन त्यांना उपलब्ध करून दिले जाते. या वापरकर्त्यांना त्यांच्या बँक खात्यातील मिळण्याबरोबरच त्यांच्या अर्जावर जवळपास रिअल-टाइममध्ये प्रक्रिया केली जाईल.
गुगल पे सोबत त्यांच्या वापरकर्त्यांसाठी हा एकात्मिक, वैयक्तिक कर्जाच्या प्रवास कायम सुरू ठेवतानाच डीएमआयने डिजिटल फायनान्स प्रणालीतील आघाडीच्या कंपन्यांच्या भागिदारीच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण डिजिटल आर्थिक उत्पादने तयार करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रती कर्ज एक लाख रुपयांपर्यंत वितरित केले जातील आणि त्याची कमाल ३६ महिन्यात परतफेड केली जाईल. ही भागीदारी १५ हजार पेक्षा जास्त पिन कोडवर सुरू करण्यात येत आहे.
‘गुगल पे’ वापरकर्त्यांना एक लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज, बड्या फायनान्स कंपनीची घोषणा
- Advertisement -