नगर: कुकडी प्रकल्पाच्या डिंभे धरणातून माणिकडोह धरणात बोगदा बांधण्यासाठी तीन वर्षापूर्वी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.
त्यामुळे पारनेर,श्रीगोंदा,कर्जत जामखेड आणि करमाळा या तालुक्याला हक्काचे पाणी मिळण्यासाठी उपयोग होणार होता परंतु त्याचे काय झाले हे कळेल काय…?,असा सवाल भाजप नेते माजी मंत्री राम शिंदे यांनी केला आहे. भाजप सरकारच्या काळात ही मंजुरी मिळाली होती. परंतु महाविकास आघाडी सरकार आल्यावर काम रखडल्याने शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
चार तालुके हक्काच्या पाण्यापासून वंचित, त्या कामाचे काय झाले? प्रा. राम शिंदे यांचा सवाल
- Advertisement -