Friday, January 17, 2025

चार वर्षांखालील मुलांना दुचाकीवर बसवून नेण्याबाबतच्या सुरक्षा उपाययोजनांसाठी अधिसूचना जारी

नवी दिल्‍ली, 16 फेब्रुवारी 2022

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 15 फेब्रुवारी 2022 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेच्या माध्यमातून सीएमव्हीहीआर, 1989 च्या नियम 138 मध्ये सुधारणा केली असून त्यानुसार चार वर्षांखालील मुलांना घेऊन दुचाकीवर मागे बसवून नेणे किंवा त्यांना दुचाकीवरून नेण्यासाठी केलेल्या सुरक्षा उपाययोजनांशी संबंधित नियम निर्धारित केले आहेत. मोटार वाहन कायद्याच्या कलम 129 अंतर्गत हे नियम अधिसूचित करण्यात आले आहेत , ज्यामध्ये केंद्र सरकार नियमांनुसार, चार वर्षांखालील मुलांना दुचाकीवर मागे बसवून नेणे किंवा त्यांना दुचाकीवरून नेण्यासाठी मुलांच्या सुरक्षेसाठी काही उपाययोजना करू शकते.या नियमांमध्ये सुरक्षा सामग्री आणि मजबूत हेल्मेटचा वापर त्याचप्रमाणे अशा दुचाकीचा वेग 40 किमी प्रतितास पर्यंत मर्यादित असावा हे नमूद करण्यात आले आहे.

केंद्रीय मोटार वाहन (दुसरी दुरुस्ती) नियम, 2022 प्रसिद्ध झाल्यापासून एका वर्षानंतर हे नियम लागू होतील.

Related Articles

1 COMMENT

Comments are closed.

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles