Monday, September 16, 2024

जिल्हाधिकारी कार्यालय येथे भुईकोट किल्ला सुशोभीकरण संदर्भात बैठक

भुईकोट किल्ला सुशोभीकरणा बाबत शहरवासीयांची मते घेणार जाणुन – आ.संग्राम जगताप

नगर – भुईकोट किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा नगर शहराला लाभलेला आहे या किल्ल्याचे सुशोभीकरण व्हावे व पर्यटनासाठी हा किल्ला खुला करावा यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू होता सुशोभीकरणासाठी राज्य शासनाकडून मोठा निधी प्राप्त झाला आहे आज जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न होऊन किल्ला सुशोभीकरण करण्यासाठी नगरकरांची मते जाणून घेण्याचा निर्णय झाला असल्याचे माहिती आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी दिली
जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली भुईकोट किल्ला सुशोभीकरणासाठी बैठक संपन्न झाली समवेत आमदार संग्राम जगताप, आयुक्त शंकर गोरे, बांधकाम विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय पवार,जिल्हा नियोजन समिती अधिकारी निलेश भदाणे,ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख, संतोष यादव, शहर अभियंता सुरेश इथापे, इंजि.श्रीकांत लिंबाळकर आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप पुढे म्हणाले की भुईकोट किल्ला सुशोभीकरण झाल्यानंतर पर्यटनाला एक वाव मिळणार आहे या माध्यमातून रोजगार निर्मिती होणार आहे .भुईकोट किल्ला माध्यमातून अहमदनगर चा इतिहास देशासमोर येईल लवकरच भुईकोट किल्ला परिसराची पाहणी करून सुशोभीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. यासाठी नगरकरांनी लवकरात लवकर आपल्या सुचना माझ्याकडे मांडाव्यात असे ते म्हणाले

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles