Sunday, September 15, 2024

जिल्ह्यात बाधितांपेक्षा बरे होणारे दुप्पट…..रिकव्हरी रेट वाढला

*आज 600 रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या 294 बाधितांची रुग्ण संख्येत भर*

*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.89 टक्के*

नगर: जिल्ह्यात आज 600 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 79 हजार 245 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.89 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 294 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 4979 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 187 खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 79 आणि अँटीजेन चाचणीत 28 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 62, अकोले 13, जामखेड 25, नगर ग्रा. 24, नेवासा 01, पारनेर 10, पाथर्डी 05, शेवगांव 05, श्रीगोंदा 17, श्रीरामपूर 01, कॅंटोन्मेंट बोर्ड 03, मिलिटरी हॉस्पिटल 01, इतर जिल्हा 16 आणि इतर राज्य 04 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 06, अकोले 01, कर्जत 01, कोपरगांव 14, नगर ग्रा. 05, नेवासा 02, राहाता 35, राहुरी 03, संगमनेर 03, श्रीगोंदा 03, श्रीरामपूर 03 आणि इतर जिल्हा 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 28 जण बाधित आढळुन आले. यात मनपा 10, जामखेड 03, कर्जत 01, नगर ग्रा. 01, पाथर्डी 08, राहता 01, राहुरी 02 आणि श्रीरामपूर 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 169, अकोले 29, जामखेड 40, कर्जत 16, कोपरगाव 30, नगर ग्रा 41, नेवासा 20, पारनेर 34, पाथर्डी 22, राहाता 28, राहुरी 34, संगमनेर 10, शेवगांव 23, श्रीगोंदा 34, श्रीरामपूर 26, कॅन्टोनमेंट बोर्ड 17, मिलिटरी हॉस्पिटल 08, इतर जिल्हा 18 आणि इतर राज्य 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:3,79,245*

*उपचार सुरू असलेले रूग्ण:5979*

*पोर्टलवरील मृत्यू नोंद:7203*

*एकूण रूग्ण संख्या:3,91,427*

*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*

*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*

*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*

*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles