मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस झी मराठी वाहिनीवरील ‘किचन कल्लाकार’ या सुप्रसिद्ध कार्यक्रमात झळकणार आहेत. देवेंद्र फडणवीसही यावेळी व्हिडीओ एका बैठकीत देवेंद्रजी किती पुरणपोळ्या खाऊ शकतात? या प्रश्नावर ते 30-35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे, असं उत्तर अमृता फडणवीसांनी दिलं. तर लग्नानंतर तुमची अपूर्ण राहिलेली इच्छा कोणती, या प्रश्नावर त्यांना 30-35 पुरणपोळ्या खाताना पाहण्याची, त्याही मी न बनवलेल्या, असं उत्तर मिसेस फडणवीस यांनी दिलं.
देवेंद्र फडणवीस यांच्या ग्लॅमरस पत्नी, सजग आई, प्रेमळ सून, बँकर, निर्मात्या, गायिका, टेबल टेनिस चॅम्पियन, परफॉर्मर अशी अमृता यांची लांबलचक ओळख सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडेने करुन दिली. आमच्या फ्रीजमधून मध्यरात्री पदार्थ गायब व्हायचे. त्यामुळे मी सीआयडी चौकशी लावली. मी त्यांची संगिनी आहे. फ्रीज बदलले आणि कुलूप किल्ल्यांचे फ्रीज आणले. फ्रीजच्या चाव्या मी माझ्याकडे ठेवते, असं अमृता फडणवीस यांनी आल्या-आल्या सांगितलं. हा भाग बुधवारी रात्री 9.30 वाजता झी मराठीवर पाहता येणार आहे.
देवेंद्रजी 30-35 पुरणपोळ्या पातेलंभर तूपासोबत सहज खायचे
- Advertisement -