Sunday, March 16, 2025

देशात मोदी सरकारच्या ३.० पर्वाला सुरुवात ,नगर शहरात वंदे मातरम युवा प्रतिष्ठानच्या वतीने जल्लोष

अहमदनगर: भारताचे हिंदू हृदय सम्राट आणि कट्टर हिंदू प्रेमी मा. नरेंद्र मोदीजी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान झाले. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून वंदे मातरम युवा प्रतिष्ठानच्या वतीने वंदे मातरम चौकात मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला. संध्याकाळी ७:१५ वाजता, वंदे मातरम चौकात वंदे मातरम युवा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी बाजारपेठेतील व्यापारी बांधव, कापड बाजार श्री गणेश मित्र मंडळ, आणि अहिल्यानगर व्यापारी महासंघाच्या सभासदांच्या साथीने मोदीजींच्या शपथ विधीचे सुवर्ण क्षण साजरे केले. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, आणि सर्वांचे तोंड गोड करत वनफे मातरम प्रतिष्ठान मार्फत लाडू वाटप करण्यात आले. दिल्लीतील राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदी यांच्या शपथ विधीचा सोहळा सुरू होताच, उपस्थितांनी ‘जय श्रीराम’ आणि ‘वंदे मातरम’ च्या जयघोषांनी संपूर्ण बाजारपेठ दुमदुमून टाकली.
व्यापारी संघाचे अध्यक्ष इश्वर बोरा यांनी देशभरातील मोदी समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे सांगितले. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजपा सर्वात जास्त संख्येने निवडून आल्याबद्दल त्यांनी देशातील जनतेचे आभार मानले.
व्यापारी पेठेचे प्रतीक बोगवत यांनी आपल्या उद्बोधनात सांगितले की, “निश्चितच मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात देश गेल्या १० वर्षांत ज्या पद्धतीने प्रगती करत आहे, त्याचा चढता आलेख पुढेही कायम राहील. पुढील पाच वर्षांत भारत एक सशक्त आणि स्वावलंबी देश म्हणून उभारून येईल.”
वंदे मातरम चे माजी अध्यक्ष व भारतीय जनता पार्टी चे एकनिष्ठ पदाधिकारी श्री महावीर कांकरिया यांनी मोदीजींना शुभेच्छा देत, त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात समान नागरिक कायदा, नागरिकत्व दुरुस्ती विधेयक, एक देश एक निवडणूक असे प्रलंबित कायदे संमत करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
वंदे मातरम् चे वर्तमान अध्यक्ष आदित्य गांधी यांनी संपूर्ण बाजारपेठेच्या वतीने मोदीजींना आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला शुभेच्छा दिल्या.
हिंदू प्रेमी उत्कर्ष गीते यांनी देखील देशभरातील जनतेने मतदानात सक्रिय सहभाग नोंदविल्याबद्दल मतदारांचे आभार मानलेत तर ज्यांनी ज्यांनी मतदान केले नाहीत त्यांनी नक्कीच विचार करण्याची गरज आहे व येणारे भविष्य त्यांना कदापी माफ करणार नाही असे बोलून दाखवले. देशाला सशक्त करणेकरीता सर्वांनीच मतदानात सहभागी होणे की देशाप्रती प्रेम व्यक्त करण्याची एक संधी असल्याचे देखील त्यांनी सांगितले. या वेळी दीपक चिंटू भाऊ खंडेलवाल, ओमप्रकाश बायड, सौरभ भैय्या भांडेकर, निलेश गुंदेचा, संतोष ठाकूर, विजय आहेर, अमित नवलानी, अभय गांधी, पवन किथानी, संजय कांगला, सचिन चोपडा, सुमित गायकवाड, लाभेश तलरेजा, तेजस डहाळे, केतन मुथा आदी अनेक व्यापारी व सभासद मोठ्या संख्येने सामील झाले होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles