नेत्रदूत पुरस्कारा’बद्दल जालिंदर बोरुडे यांचा नागरदेवळे ग्रामपंचायतीच्यावतीने सत्कार
राष्ट्रीय स्तरावरील ‘नेत्रदूत पुरस्कार’ हा बोरुडे यांच्या चांगल्या कामाची पावती -माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले
नगर – आज आरोग्य सेवा महाग होत चालली आहे, छोट-छोट्या उपचारांसाठी मोठा खर्च येतो. अशा परिस्थितीत मोफत आरोग्य शिबीराच्या माध्यमातून जालिंदर बोरुडे हे गोर-गरीब, गरजूंना मोठा आधार वाटत आहेत. त्यांनी मोफत शिबीराच्या माध्यमातून शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्य सेवा पुरवून देवदूतासारखे काम करत आहेत. दर महिन्याला मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शास्त्रक्रिया शिबीराच्या माध्यमातून सुरु असलेले कार्य असामान्य असेच आहे. अंधांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे काम ते करत आहेत, त्यांच्या उपक्रमाची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावरील ‘नेत्रदूत पुरस्कार’ ही त्यांच्या चांगल्या कामाची पावती आहे. त्यांचे हे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असेच आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
नवीदिल्ली येथील राष्ट्रीय अंधत्व निवारण समितीचा ‘नेत्रदूत पुरस्कार’ मिळाल्याबद्दल जालिंदर बोरुडे यांचा नागरदेवळे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, युवा नेते अक्षय कर्डिले, मार्केट कमिटीचे सभापती अभिलाष गिघे, उपसभापती संतोष म्हस्के, भिंगार बँकेचे व्हाईस चेअरमन किसनराव चौधरी, पं.स.सदस्य राहुल पानसरे, राम पानमळकर, अण्णा चौधरी, सरपंच सौ.पानमळकर, उपसरपंच शरद गायकवाड, सदस्य सोनू भुजबळ, आयुब पठाण, योगेश भंडारे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी अरुण मुंडे म्हणाले, जालिंदर बोरुडे यांनी मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शिबीराच्या माध्यमातून जनमानसात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांचे हे कार्य असमान्य असेच आहे. त्यांच्या कार्याची दाखल राष्ट्रीय पातळीवर घेऊन दिलेला पुरस्कार हा नगरकरांच्या दृष्टीने मानाचा तुरा असल्याचे सांगितले.
यावेळी अभिलाष गिघे, संतोष म्हस्के, शरद गायकवाड आदिंनीही आपल्या मनोगतातून जालिंदर बोरुडे यांनी वायफट खर्चपेक्षा जनसेवेला महत्व देऊन आरोग्य क्षेत्रातील कार्य समाजातील इतरांसाठी प्रेरणादायी आहे. जनसेवेचे त्यांचे हे व्रत असेच यापुढे सुरु राहो, असे सांगून पुरस्काराबद्दल अभिनंदन केले.
सत्कारास उत्तर देतांना जालिंदर बोरुडे म्हणाले, सर्वांच्या सहकार्याने गेल्या अनेक वर्षांपासून आपण जनसामान्यांची आरोग्य शिबीराच्या माध्यमातून सेवा करत आहोत. या कार्यात सहभागी असलेल्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून माझा झालेला गौरव प्रोत्साहन ठरणारा आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनू भुजबळ यांनी केले तर आयुब पठाण यांनी आभार मानले.
‘नेत्रदूत पुरस्कार’ ही त्यांच्या चांगल्या कामाची पावती माजी मंत्री शिवाजी कर्डिले
- Advertisement -