येत्या ४ जून रोजी देशात पुन्हा एकदा भाजपाचे सरकार येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. तसेच माझा १०० दिवसांचा आराखडा तयार असून मी ४ जूननंतर एकही दिवस वाया घालवणार नाही, असेही ते म्हणाले. टाईम्सनाऊला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
एखाद्या गोष्टीचे आगाऊ नियोजन करणे हा माझ्या स्वभावाचा भाग आहे. ही एक प्रकारे दैवी शक्तीच म्हणावी लागेल. माझे सॉफ्टवेअर कदाचित अशा प्रकारेच डिझाइन केले गेले आहे.
ते म्हणाले, “माझा १०० दिवसांचा आराखडा तयार आहे. ४ जूननंतर मला एक दिवसही वाया घालवयाचा नाही. विलंबाने निर्णय घेण्याच्या पद्धतीमुळे देशाला बराच त्रास सहन करावा आहे. मला असे होऊ द्यायचे नाही. गेल्या १० वर्षात तुम्ही केवळ माझ्या कामाचा ट्रेलर बघितला आहे. यापुढे बरंच काही बघायचं आहे.”