बारामतीत शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा फोटो काळ्या कपड्याने झाकल्याने महायुतीत पुन्हा एकदा खटका उडाला आहे. या घटनेवर आमदार अमोल मिटकरींनी टिका केलीय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्यावतीने बारामतीमध्ये गणेश फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या कमानी बारामती शहरात विविध ठिकाणी लावण्यात आल्या आहेत. त्यात, एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत. बारामती शिवसेनेच्यावतीने आयोजित एकनाथ महोत्सवाच्या उद्घाटनाला अजित पवार न आल्याने शिवसेनेच्या सुरेंद्र जेवरे यांनी अजित पवारांच्या फोटो वरती काळं कापड टाकल्याने पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे, बारामतीमधील हा प्रकार राज्यभर चर्चेचा विषय बनला आहे. आता, त्यावर, आमदार अमोल मिटकरी यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. त्यामुळे, महायुतीत पुन्हा एकदा शिवसेना-राष्ट्रवादी आमने-सामने आले आहेत.