शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी 7 हजार मतांनी पकंजा मुंडेंचा पराभव केला आहे.. त्यामुळे हायहोल्टेज लढतीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा फॅक्टर महत्वाचा मानला गेला. दिवसभर अटीतटीची लढत सुरु असताना शेवटच्या फेरीत बजरंग सोनवणेंनी विजय मिळवलाय.
भाजप उमेदवार पंकजा मुंडेंकडून बीड , गेवराई विधानसभा मतदारसंघात फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली होती. बीड लोकसभा मतदारसंघात अतिशय अटीतटीच्या लढतीत 32 व्या फेरीमध्ये निकाल समोर आला होता. 31 व्या फेरीनंतर पंकजा मुंडे 400 मतांनी आघाडीवर होत्या. मात्र, शेवटच्या फेरीपर्यंत बीडमध्ये ट्वीस्टवर ट्वीस्ट पाहायला मिळत आहेत. पंकजा मुंडे यांनी 34 हजारांचा लीड घेतला होता. तो बजरंग सोनवणे यांनी 4 ते 5 फेऱ्यांमध्ये मोडित काढला होता. आज सकाळपासूनच बीडमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळत होता. बीड लोकसभा मतदारसंघ मराठा विरुद्ध ओबीसी राजकारणामुळे अतिशय संवेदनशील बनला होता