Sunday, September 15, 2024

भररस्त्यात थरार RTI कार्यकर्त्यावर गोळीबार

नाशिकमध्ये RTI कार्यकर्त्यावर गोळीबार, भररस्त्यात थरार, प्रशांत जाधव जखमी

नाशिक : नाशिकमध्ये माहिती अधिकार कार्यकर्त्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात प्रशांत जाधव जखमी झाले आहेत. नाशिक शहरातील सिडको भागात असलेल्या उपनगर परिसरात सोमवारी रात्री ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात जाधव यांच्या मांडीला एक गोळी लागली तर दुसरी गोळी पोटाला चाटून गेली. जखमी प्रशांत जाधव यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

सामाजिक कार्यांमध्ये अग्रेसर असलेले आणि एका पक्षाचे पदाधिकारी असलेले प्रशांत जाधव यांच्यावर नाशिकमधील एका मेडिकल स्टोअरजवळ अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याचं समोर आलं आहे. या हल्ल्यात जाधव जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles