Tuesday, April 23, 2024

मराठा आंदोलन पंतप्रधान मोदींच्या वाराणसीत… लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार…

आगामी लोकसभा निवडणुकीत प्रशासनापुढे अडचणी निर्माण करण्याची तयारी मराठा आंदोलकांनी केली आहे. मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उमेदवारी जाहीर झालेल्या वाराणसी मतदार संघात अडचणी निर्माण करण्याची रणनीती तयार केली आहे. त्यासाठी वाराणसी येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात 1 हजार उमेदवारी अर्ज भरण्याचा इशारा दिला आहे. हजारापेक्षा जास्त उमेदवार असल्यास ईव्हीएमवर मतदान घेता येत नाही. त्यामुळे मराठा समाजाने हा निर्णय घेतला आहे.

मराठवाडा व महाराष्ट्रातून वाराणसीत लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असल्याचे मराठा आरक्षणाचे आंदोलक विनायक पाटील यांनी म्हटले आहे. त्यासाठी वाराणसीत आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आत्महत्या केलेल्या मराठा तरुणांच्या अस्थी गंगा नदीत विसर्जित करुन करणार आत्मक्लेश करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मराठवाड्यातील हैद्राबाद गॅझेट स्वीकारून सरसकट कुणबी मराठा आरक्षण देण्याची मागणी विनायक पाटील यांनी केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles