Saturday, May 18, 2024

महायुतीत काय चाललय..? आमदार म्हणतात विधानसभेची गॅरंटी दिली तरच खासदारकीला मदत…

रायगडमधून भरत गोगावलेंनीही युतीचे उमेदवार सुनील तटकरेंना थेट इशारा दिला आहे.रायगडमधून सुनील तटकरेंना पुन्हा खासदार करण्याची गॅरंटी आम्ही घेतलेली आहे. आता त्यांनाही आमची विधानसभेसाठी गॅरंटी घ्यावीच लागणार आहे. आम्हीही रायगडचे मावळे आहोत. त्यामुळे त्यांनी विधानसभेला आमची गॅरंटी घेतली नाही तर त्यांना दाखवून देऊ, असा थेट इशाराच गोगावलेंनी तटकरेंना दिला आहे.

महायुतीत लोकसभेच्या काही जागांवरील उमेदवारीवरून चांगलेच रणकंदन सुरू आहे. काही जागांवर उमेदवार निश्चित झाले तरी घटक पक्षांतील नेत्यांनाही विधानसभेची गॅरंटी हवी आहे. इंदापूरमधील हर्षवर्धन पाटील, पुरंदरमधील विजय शिवतारें यांनीही यापूर्वी अशीच गॅरंटी मागितली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles