बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची दुसरी बैठक पार पडली असून या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत केंद्र सरकारने १४ पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (एमएसपी) मोठी वाढ केली आहे. मोदी सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिलं असून आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या दृष्टीने बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.
नवे दर (प्रति क्विंटलमध्ये )
१) नाचणी – २४९० रुपये
२) बाजरी – २६२५ रुपये
३) सोयाबीन – ४८९२ रुपये
४) मुग – ८६९२ रुपये
५) तूर – ७५५० रुपये
६) तिळ – ९२६७ रुपये
७ भात – २३०० रुपये
८) ज्वारी – ३३७१ रुपये
९ ) उडीद – ७४०० रुपये
१० )कापूस – ७१२१ रुपये
११) भुईमुग – ६७८३ रुपये
१२) रेप सीड – ८७१७ रुपये
१३) मका – २२२५ रुपये
१४) सूर्यफुल – ७२८० रुपये