नवी दिल्ली – संजय राऊत यांच्या स्फोटक पत्रकार परिषदेनंतर आज नवी दिल्लीत किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली. किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेत रश्मी ठाकरे यांच्या बंगल्यांच्या मुद्यावरुन आणि रश्मी ठाकरे यांचे बंधू पाटणकर यांनी कर्जतमध्ये घेतलेल्या जमिनीसंदर्भात उत्तर देत पुन्हा प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. कर्जतच्या हिंदू देवस्थानाची जमीन मुस्लीम व्यक्तीकडून रश्मी ठाकरे यांचा भाऊ पाटणकर यांनी जमीन खरेदी केली, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी कर्जतच्या जमिनीच्यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.यासंदर्बात किरीट सोमय्या यांनी भाष्य केलं आहे. मी कर्जतला गेलो. तिथे चौकशी केली. श्रीधर पाटणकर हे उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे असून रश्मी यांचा भाऊ आहेत. ती जमीन आधी सलीमच्या नावे ट्रान्सफर झाली. हिंदू देवस्थानाची जमीन आणि मुस्लिमाच्या नावे, आणि मग पाटणकरांच्या नावावर झाली, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
रश्मी ठाकरेंच्या बंधूवरुन सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांना घेरलं
- Advertisement -