आमदार संदीप क्षीरसागर यांची बीड जिल्ह्यात एक सभा होती. तिथे त्यांनी भाषण केलेला व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय. त्या भाषणात आमदार क्षीरसागर म्हणतात, माझा एक डायलॉग ऐका सर. मी नुकताच एक पिच्चर बघितलाय. मी प्रत्येक निवडणुकीमध्ये सांगतोय, सर्व एक होऊन लढणार आहेत. हे चित्र तुम्हाला अजून सुद्धा दिसेल. जेव्हा लोक सोबत येत नाहीत, तेव्हा ही परिस्थिती होती. आणि ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा हे सर्व एकत्र येऊन लढणार. पण मला भीती नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
आमदार संदीप क्षीरसागर भाषणात आपल्या विरोधकांना इशारा देताना म्हणाले की, तु्म्ही सर्व एकत्र येऊन लढा. मला भीती नाही. कारण माझ्या आई-बहिणींचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. युवकांची ताकद माझ्यासोबत आहे. ज्येष्ठांची ताकद माझ्यासोबतय. मी पुष्पा पिच्चर पाहिला. लई दिवस पिच्चर पाहिला नव्हता. मला वेळच नव्हता. त्यादिवशी औरंगाबादला गेलो होतो कामानिमित्त. त्यादिवशी थोडासा वेळ होता. म्हणल पिच्चरला जावं. त्या पिच्चरमध्ये डायलॉग होता. झुकेगा नही…एवढीमोठी निवडणूक लढली, ही तर नगरपालिकेची निवडणूक. त्याचं काय एवढं, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. त्यांचा हा अनोखा अंदाज पाहून उपस्थितांनी टाळ्या, शिट्ट्या आणि वन्समोरची मागणी केली.
राष्ट्रवादीचे आमदार जाहीर सभेत ‘पुष्पा’ स्टाईलने म्हणाले…झुकेंगा नही…
- Advertisement -