विरोधी पक्षनेते राहुल गांधी लोकसभेमध्ये वारंवार जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करत आहेत. अर्थसंकल्पावरील त्यांच्या भाषणातील जातनिहाय जणगणनेचा मुद्दा गाजला. भाजपच्या नेत्यांकडून राहुल गांधी यांना कडाडून विरोध करण्यात आला.
मात्र, एनडीए सरकारमधील मंत्री अनुप्रिया पटेल यांनी राहुल गांधी यांच्या जातनिहाय जनगणनेचे समर्थन केले आहे. आपल्याकडे जातनिहाय डेटा असणे आवश्यक असल्याचे अनुप्रिया पटेल यांनी म्हटले आहे.
जातनिहाय जनगणनेचे समर्थन करताना पटेल यांनी अखिलेश यादव यांच्यावर टीका केली आहे. अखिलेश यादव जातनिहाय जनगणनेचे समर्थन करत आहेत. मात्र, त्यांचे सरकार चार वेळा होते. त्यांचे वडील तीन वेळा तर ते स्वतः एक वेळा मुख्यमंत्री होते. मग त्यांनी जातनिहाय जनगणना का केली नाही? असा सवाल उपस्थित पटेल यांनी उपस्थित केला.