नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टंट या पदाच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आरबीआयमध्ये मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आरबीआयमध्ये असिस्टंटच्या 950 पदांसांठी भरती करण्यात येत आहे. या पदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं सुरु होणार आहे.आरबीआयच्या वेबसाईटवर भेट देऊन इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करु शकतात. अर्ज दाखल करण्यास 17 फेब्रुवारीपासून सुरुवात होईल. निवड झालेल्या उमदेवारांना देशातील विविध शहरांमध्ये रुजू व्हावं लागेल. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार असिस्टंट या पदासाठी अर्ज दाखल करायचा असल्यास तो ऑनलाईन पद्धतीनं सादर करावा लागेल. rbi.org.in या वेबसाईटवर अर्ज दाखल करण्याची सुविधा 17 एप्रिलपासून उपलब्ध होणार आहे. तर, अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 8 मार्च आहे. आरबीआयकडून या पदांसाठी परीक्षा 26-27 मार्च रोजी घेण्यात येणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमदेवारानं भारत सरकारनं मान्यता दिलेल्या कोणत्याही विद्यापीठातून 50 टक्के गुणासंह पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेलं असणं आवश्यक आहे. एसटी, एससी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी केवळ उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. 20 ते 28 वयोगटातील उमेदवार अर्ज दाखल करु शकतात. पात्र उमेदवार आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर 8 मार्चपर्यंत अर्ज सादर करु शकतात.