भाजपच्या दोन आमदारांमध्ये सध्या चांगलीच जुंपली आहे,निमित्त ठरलं सोलापूर. सोलापूर हे खेडे असल्याच्या वक्तव्यावरून भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि दुसरे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यात शाब्दिक युद्ध रंगल्याचे पाहायला मिळत आहे.सोलापूर हे मोठं खेडं आहे. याचा आणखी विकास करून कसे मोठे करता येईल. याचा नावलौकिक कसा वाढवता येईल यासाठी काम केले पाहिजे, असं वक्तव्य आमदार सुभाष देशमुख यांनी केले होते.
मात्र यातील सुभाष देशमुखांच्या ‘खेडे’ या शब्दाला भाजपचे दुसरे आमदार विजयकुमार देशमुख यांनी आक्षेप घेतला. सुभाष बापू खेडं का म्हणाले कळले.
जिल्ह्यात सोन्याचा धूर निघत होता. येथील चादरीचे कारखाने प्रसिद्ध होते.दरम्यान आमदार सुभाष देशमुख यांच्या वक्तव्याचे समर्थन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते महेश कोठे यांनी केले. सोलापूर हे खेडं आहे या आमदार सुभाष देशमुखांच्या म्हणण्यात तथ्य आहे. कारण इथला शिकलेला मुलगा आज बाहेर चालला आहे. तो बाहेर गेला की दोन वर्षात घर घेतो, मात्र इथला मनपा कर्मचारी 20 वर्षे घर घेऊ शकत नाही.
सत्ताधारी आमदारांच्या विधानामुळे सोलापूर जिल्ह्याचा विकास झाला की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला. विकासाच्या मुद्द्यावर भाजपच्या दोन आमदारांमध्ये जुंपल्याने, याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.