श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानच्यावतीने शरद झोडगे,मंगलताई लोखंडे, प्रा.संजय पडोळे यांचा सत्कार
पद व प्रतिष्ठेचा समाजाच्या उन्नत्तीसाठी काम करावे
– पंडितराव खरपुडे
नगर – लोककल्याणकारी कार्य करणारी व्यक्ती आपल्या कामाने ओळखली जात असते. आपल्याला मिळालेल्या जबाबदारी व पदाचा उपयोग करुन सेवा करण्याचा ते प्रयत्न करत असतात. त्यातून अनेक माणसे जोडून समाजात चांगले काम निर्माण होत असते. जि.प.सदस्य शरदराव झोडगे व मंगलताई लोखंडे हे लोकाभिमुख काम करत आहेत तर प्रा.संजय पडोळे नवीन पिढी घडविण्याचे काम करत आहेत. त्यांना मिळालेल्या पद व प्रतिष्ठेचा समाजाच्या उन्नत्तीसाठी काम करुन हे कार्य व्यापक करण्याचा प्रयत्न आजच्या सत्कारमुर्ती करतील, असा विश्वास श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे यांनी कले.
शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानच्यावतीने जिल्हा नियोजन समितीवर जि.प.सदस्य शरद झोडगे यांची निवड, स्थायी समिती सदस्यपदी मंगलताई लोखंडे व रुपीबाई बोरा शाळेचे नूतन मुख्याध्यापक प्रा.संजय पडोळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, विश्वस्त विजय कोथिंबीरे, पांडूरंग नन्नवरे, रंगनाथ फुलसौंदर, गजानन ससाणे, चंद्रकांत फुलारी, विष्णूपंत म्हस्के, बजरंग भुतारे, मंदार लोखंडे, मच्छिंद्र फुलसौंदर, नारायण धाडगे आदि उपस्थित होते.
प्रास्तविका विजय कोथिंबीरे यांनी केले तर आभार गजानन ससाणे यांनी मानले.