नगर: प्रसारमाध्यमांमध्ये श्री. साईबाबांच्या शिर्डीवर दहशतवाद्यांची
वक्रदृष्टी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असुन, दुबईवरुन आलेल्या दहशतवाद्यांनी शिर्डीत
रेकी केल्याची कबुली दिल्याने खळबळ माजलीय अशा स्वरुपाची बातमी प्रसिध्द करण्यात आली होती.
अहमदनगर जिल्हा पोलीस दलाचे वतीने नमुद बातमीची गांभिर्याने दखल घेवुन सर्व संबंधीत
तपास यंत्रणाशी संपर्क करुन प्रसिध्दीस दिलेल्या बातमीची खात्री केली असता अशा प्रकारची घटना
अहमदनगर जिल्ह्यात कोठेही घडली नसून, श्री. साईबाबांच्या शिर्डीवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी
प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिध्दीस दिलेल्या बातम्या या निरर्थक व निराधार आहेत.
श्री. साईबाबा मंदीर शिर्डी हे आतंरराष्ट्रीय देवस्थान असुन दर्शनास येणा-या भाविकांनी व
स्थानिकांनी अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस
अधिक्षक, अहमदनगर यांनी अवाहन केले आहे.
शिर्डीतील रेकीच्या बातम्यांचे पोलिसांकडून खंडण, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
- Advertisement -