गणेश आवारे सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने आर्थिक मदत
नगर तालुका- नगर तालुक्यातील ससेवाडी येथील ग्रामदैवत बिरोबा मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर असून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत बांधकामावर वीट ठेवण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
ससेवाडी गाव डोंगरदऱ्यात वसलेले असून पवित्र सीना नदीचा उगम येथून झाल्याने गाव राज्यात परिचित आहे. तसेच कांदा उत्पादनात अग्रेसर म्हणून ससेवाडी गावचे नाव लौकिकास आलेले आहे. गावची लोकसंख्या दोन हजार असुन येथील ग्रामदैवत बिरोबा मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे काम लोकवर्गणीतून सुरू करण्यात आले आहे. जिर्णोद्धारासाठी सुमारे ७० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. जेऊर पंचक्रोशीतून तसेच कांदा व्यापाऱ्यांकडून, आडतदार यांच्याकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळाली असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
बिरोबा मंदिराच्या कामाचे भूमिपूजन देवगड देवस्थानचे ह.भ.प भास्करगिरी महाराज व माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले होते. गणेश आवारे सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने ५१ हजार रुपयांची देणगी बिरोबा मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी देण्यात आली. यावेळी परिसरातील अनेक नागरीकांकडुन मंदिर जीर्णोद्धारासाठी देणग्या देण्यात आल्या.
यावेळी बोलताना गणेश आवारे यांनी सांगितले की, जेऊर परिसर धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेताना दिसून आला आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वात जास्त लोकवर्गणीतून बांधण्यात आलेले धार्मिक स्थळे जेऊर गावामध्ये आहेत. बिरोबा मंदिरासाठी ही पंचक्रोशीतील नागरिकांनी सढळ हाताने मदत केलेली आहे व अशीच मदत पुढे चालू राहील असा विश्वास आवारे यांनी व्यक्त केला. ससेवाडी गावचे माजी उपसरपंच शंकर बळे यांनी मंदिर जीर्णोद्धारासाठी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन ससेवाडी ग्रामस्थांच्या वतीने केले.
यावेळी मिरी येथील ह.भ.प. सिताराम महाराज भगत, जेऊर गावचे माजी सरपंच मधुकर मगर, युवा नेते गणेश आवारे, ग्रामपंचायत सदस्य दिनेश बेल्हेकर, आप्पा बनकर यांच्यासह बिरोबा मंदिर जीर्णोद्धार समितीचे सदस्य व ससेवाडी चे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ससेवाडी येथील बिरोबा मंदिर जीर्णोद्धाराचे काम प्रगती पथावर
- Advertisement -