मुंबई: प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचे आज निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. राहुल बजाज यांचा जन्म दहा जून 1938 मध्ये झाला होता. बजाज यांनी अर्थशास्त्र आणि लॉमध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून ‘एमबीए’ देखील पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राहुल बजाज यांची 1968 मध्ये बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. बजाज उद्योग समुहाला मोठे करण्यात राहुल बजाज यांचे योगदान मोठे आहे. गेल्या वर्षी राहुल बजाज यांनी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पाच दशकांपासून त्यांनी बजाज ऑटोची धुरा यशस्वीरित्या सांभाळली होती. बजाज ऑटोला आघाडीवर नेण्यात राहुल बजाज यांचा महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा होता.
बजाज उद्योग समुह हा देशातील टॉप उद्योग समुहांपैकी एक आहे. बजाज ऑटोला मोठे करण्यात राहुल बजाज यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. त्यांच्या कार्याची दखल म्हणून 2001 मध्ये राहुल बजाज यांचा भारत सरकारच्या वतीने ‘पद्मभूषण’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.