Home नगर जिल्हा चिमुकलीच नाही तर अख्ख गाव ढसाढसा रडलं; अहमदनगरमधील शिक्षकाच्या बदलीचा ह्रदयस्पर्शी VIDEO

चिमुकलीच नाही तर अख्ख गाव ढसाढसा रडलं; अहमदनगरमधील शिक्षकाच्या बदलीचा ह्रदयस्पर्शी VIDEO

0
22

शिक्षकाची बदली झाल्याने शाळेतील मुलांनी धाय मोकलून रडत त्यांना निरोप दिल्याच्या तसेच गावकऱ्यांनी बदली झालेल्या शिक्षकाची गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढल्याच्या बातम्या आपण वाचल्या असतील.असाच असचं काहीसं वातावरण पाथर्डी तालुक्यातील जिल्ह परिषद प्राथमिक शाळा हनुमाननगर येथील शिक्षकांचा निरोप समारंभ पाहून झालं होतं. एका शिक्षकांच्या बदलीने फक्त विद्यार्थीच नव्हे तर गावकरीही रडले, अन् या ह्रदयस्पर्शी निरोप समारंभाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तु्म्ही पाहू शकता, लाडक्या शिक्षकाला निरोप देताना विदयार्थी आणि ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले होते. बारा वर्षांपूर्वी या शाळेत लहू विक्रम बोराटे हे प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाले. यावेळी या शाळेत फक्त वीस विद्यार्थी येत होते.. ही शाळा ऊसतोड मजूर कामगारांच्या मुलांची शाळा म्हणून ओळखली जात होती.. आज या शाळेमध्ये ५४ विद्यार्थी शिकतात.. तब्बल बारा वर्षे त्यांनी या शाळेमध्ये आपली शिक्षक सेवा पूर्ण केली आणि त्यांची १८ मे २०२३ रोजी हनुमान नगर शाळेमधून बदली झाली.
https://twitter.com/ranjitdisale/status/1671690326883590144?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1671690326883590144%7Ctwgr%5E96df2ebaf6464a322d82496f87022764570f225c%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Ftrending%2Fteacher-transfer-after-12-years-student-and-villagers-cried-hanuman-nagar-pathardi-ahmednagar-video-viral-on-social-media-srk-21-3740000%2F