नगरच्या ‘कायनेटिक’ मध्ये आता इलेक्ट्रिक दुचाकी निर्मिती..

0
2534

नगर: अग्रगण्य कायनेटिक कंपनीने इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादनाचा प्रकल्प अहमदनगर मध्ये सुरु केला आहे.
कायनेटिक ग्रीन च्या संस्थापिका सुलज्जा फिरोदिया मोटवानी यांनी ट्विट करून ही घोषणा केली आहे.
मेड इन अहमदनगर “भारतातील सर्वात पहिली लुना” ते “इलेक्ट्रिक दुचाकींचे उत्पादन” हा औद्योगिक प्रवास अहमदनगरसाठी महत्त्वपूर्ण आहे. कायनेटिक कंपनीने लुना निर्मिती नगरलाच सुरू केली होती. आता नव्या जमान्यातील इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठीही नगरलाच प्राधान्य देण्यात आले आहे.