पारनेर नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली आहे. मात्र अहमदनगर जिल्हा परिषद व पारनेर पंचायत समिती निवडणुकांत शिवसेनेची ताकद दाखविण्याची तयारी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून विखे पाटील कुटुंबाचे खंदे समर्थक समजले जाणारे अळकुटीचे ( ता. पारनेर ) डॉ. भास्करराव शिरोळे यांचा शनिवारी शिवसेनेत प्रवेश होणार आहे.
विखे कुटुंबाचे समर्थक असलेले डॉ. शिरोळे यांच्या पक्ष प्रवेशामुळे अळकुटी परिसरात शिवसेनेची ताकद वाढणार आहे. याचा फायदा शिवसेनेला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत होईल.