पुणे: राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी पार्थ पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त एक फेसबूक पोस्ट लिहिली होती. त्यात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पार्थ पवारांना मावळ द्यावा आणि खासदार श्रीरंग बारणे यांना राज्यसभेत पाठवावे, अशी मागणी केली होती. त्यासंदर्भाने आमदार रोहित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.
आ.पवार म्हणाले, पार्थ पवार यांनी निवडणूक लढवावी, ही फक्त सोशल मीडियावर चर्चा आहे. पार्थ पवार हे याबाबत अजून काहीही बोलले नाहीत. ही फक्त अफवा असेल, तर त्यात का लक्ष घालावे? पण, निवडणूक लढविण्याबाबतचे काही प्रपोजल आले, तर पार्थ यांच्यासोबत मी तेव्हाही होतो, आजही आहे आणि भविष्यातही कायम राहीन.