नवी दिल्ली: गेल्या सलग दिवसांपासून इंधनदरात वाढ होताना पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडलेले असताना भारतातील पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलेली आहे. पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सुरुच असून, बारा दिवसातील ही दहावी दरवाढ आहे.
पेट्रोलियम कंपन्यांनी एक दिवस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा इंधन दरवाढ केली आहे. गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर देशभरात पेट्रोल ८० पैसे आणि डिझेल ८५ पैशांनी महागले. पेट्रोलियम कंपन्यांनी २२ मार्चपासून इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे. या दरम्यान पेट्रोल आणि डिझेल ७ रुपये २० पैशांनी महागले आहे.