भंगाराच्या गोदामाला आग, 11 कामगारांचा मृत्यू

0
253

हैदराबादमधील बोयागुडा भागात भंगाराच्या गोदामाला आग लागल्याची घटना समोर आली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. 11 जणांचा या आगीमध्ये जागीच मृत्यू झाला आहे.
माहितीनुसार घटनेच्या वेळी हे सर्व कामगार गोदामात झोपले होते. आग इतकी जास्त भीषण होती की, गोदामामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढणे देखील शक्य झाले नाही. विशेष म्हणजे या आगीमधून फक्त एकाला बाहेर काढण्यात यश आले आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. माहितीनुसार, आतापर्यंत 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी वेळ लागला. सध्या आग पूर्णपणे विझवण्यात आली आहे. गोदामात काम करणारे सर्व मजूर बिहारचे असल्याचे सांगितले जात आहे.