केंद्र सरकारनं देशातील सर्व राज्यांना करपरतावा जारी केला आहे.भांडवली खर्चाला गती देण्यासाठी, विकास आणि कल्याणाशी संबंधित खर्चांना वित्तपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारांना या निधीचं वाट केलं आहे. केंद्राच्या अर्थ मंत्रालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. केंद्रानं राज्यांना एकूण 1 लाख 73 हजार 030 कोटी रुपयांचे कर हस्तांतरण केलं. महाराष्ट्राला 10930.31 कोटी रुपयांचा निधी मिळाला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे आभार माणे आहेत.
केंद्र सरकारने काल राज्य सरकारांना त्यांच्याकडे जमा झालेल्या कराच्या रकमेतून 1 लाख 73 हजार 030 कोटी रुपयांचे कर हस्तांतरण जारी केले. डिसेंबर 2024 मध्ये राज्य सरकारांना जारी करण्यात आलेले कर हस्तांतरण 89,086 कोटी रुपये इतके होते.त्या तुलनेत जानेवारी महिन्यातील रकमेमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.
केंद्रानं राज्यांच्या भांडवली खर्चाला गती देण्यासाठी, तसेच विकास आणि कल्याणाशी संबंधित खर्चाला वित्तपुरवठा करण्यास राज्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने या महिन्यात अधिक रक्कम हस्तांतरित केली जात असल्याची माहिती दिली.
https://x.com/Dev_Fadnavis/status/1877670374202331297