शिर्डी एमआयडीसीच्या रस्ते आणि वीज विकासासाठी 100 कोटी रुपयाला मान्यता! 20 ते 25 ऑगस्ट दरम्यान डिफेन्स क्लस्टर संदर्भात एमओयू (MOU) होणार..
आज मुंबई येथे शिर्डी एमआयडीसीच्या संदर्भात उद्योगमंत्री मा.ना.श्री.उदयजी सामंत आणि महसूल तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
या बैठकीत 20 ते 25 ऑगस्ट दरम्यान शिर्डी एमआयडीसीचे भूमिपूजन आणि एमओयू (MOU) ॲग्रीमेंट साईन करण्यावर शिक्कामोर्तब झाले. तसेच एमआयडीसी संदर्भात पाणी, वीज व रस्ते विकास आणि भूसंपादनासाठी 100 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला देखील आज मंजुरी देण्यात आली. येत्या 15 ऑगस्ट दरम्यान या सर्व कामांची निविदा प्रसिद्ध होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
याप्रसंगी उद्योग विभागाचे सचिव, एमआयडीसीचे सीईओ, डिफेन्स क्लस्टर मध्ये उभ्या राहणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी व सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
शिर्डी एमआयडीसीच्या रस्ते आणि वीज विकासासाठी 100 कोटी रुपयाला मान्यता!
- Advertisement -