Saturday, January 25, 2025

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मालमत्ता करावरील शास्तीमध्ये १०० टक्के सवलत जाहीर

महानगरपालिकेच्या मालमत्ता करावरील शास्तीमध्ये जानेवारी अखेर १०० टक्के सवलत जाहीर

फेब्रुवारी अखेर शास्तीवर ७५ टक्के, २२ मार्च अखेर ५० टक्के सवलत मिळणार

महानगरपालिकेच्या सवलत योजनेचा लाभ घेऊन नागरिकांनी थकीत कराचा भरणा करावा : आयुक्त यशवंत डांगे

अहिल्यानगर – महानगरपालिकेच्या मालमत्ता कर व पाणीपट्टीची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यावर नियमानुसार शास्ती आकारली जात असल्याने नागरिकांच्या मालमत्ता करावरील थकबाकीचा बोजा वाढत आहे. महानगरपालिकेवरही आर्थिक ताण वाढत असून महानगरपालिकेच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी मालमत्ता करावरील शास्तीमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ८ जानेवारी ते ३१ जानेवारी अखेरपर्यंत मालमत्ताधारकांना शास्तीमध्ये १०० टक्के सवलत मिळणार आहे. तसेच १ ते २८ फेब्रुवारी अखेरपर्यंत ७५ टक्के, तर १ ते २२ मार्च अखेर ५० टक्के सवलत दिली जाणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे.

महानगरपालिकेने कराच्या थकबाकी वसुलीसाठी जप्ती मोहीम सुरू केली आहे. थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात येत आहेत. बहुतांश प्रकरणे लोक आदालतमध्ये घेऊन त्यात तडजोड करून मोठ्या प्रमाणात वसुली केलेली आहे. मागील तीन – चार वर्षात महानगरपालिकेने लोक अदालत च्या माध्यमातून सुमारे ३५ कोटी रुपयांची वसुली केली आहे. यंदा मार्च महिन्यामध्ये लोकअदालत होणार आहे. मात्र, तत्पूर्वी थकबाकीदारांना संधी देण्याच्या दृष्टीने व महानगरपालिकेची जास्तीत जास्त वसुली होण्यासाठी शास्तीमध्ये तीन टप्प्यात सवलत जाहीर करण्यात आली आहे.

मालमत्ताधारकांनी त्यांच्याकडील थकीत मालमत्ता कराचा भरणा ३१ जानेवारी अखेर केल्यास त्यांना शास्तीमध्ये १०० टक्के सवलत मिळणार आहे. त्यानंतर २८ फेब्रुवारी अखेरपर्यंत कर भरणाऱ्याना शास्तीमध्ये ७५ टक्के व १ ते २२ मार्च अखेर कर भरणाऱ्यांना शास्तीमध्ये ५० टक्के सवलत मिळणार आहे. थकबाकीदार मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा व थकीत कराचा भरणा करावा. महानगरपालिका जप्ती कारवाई सुरू करणार असून कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी लवकरात लवकर कराचा भरणा करावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles