महावितरण विभागात नोकरीची सुवर्णसंधी आहे. गोंदिया येथील महावितरण विभागात ही भरती केली जाणार आहे. १०वी आणि आयटीआय पास उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. कार्यकारी अभियंता, संवसु विभाग, महावितरणद्वारे ही भरती जाहीर करण्यात आली आहे.या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. वायरमन आणि लाइटमनसह इतर अनेक पदांवर ही भरती केली जाणार आहे
महावितरण विभागातील या भरतीसाठी १८ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. अप्रेंटिस पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १०वी पास+ ITI पास उमेदवार अर्ज करु शकतात. ८५ पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.
गोंदिया येथे ही भरती केली जाणार आहे.या पदासाठी भरती गुणवत्ता यादीनुसार केली जाणार आहे. या नोकरीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट आहे.याबाबत उमेदवाराने www.apprenticeshipindia.org या वेबसाइटवर जाऊन अर्ज सादर करावे लागतील.
महावितरणमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०२४ आहे. ज्या तरुणांचे शिक्षण झाले आहे त्यांना कामाचा अनुभव हवा आहे. अशा उमेदवारांसाठी नोकरीची ही चांगली संधी आहे.